आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पूरस्कार देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही मागणी करणारे पत्र भटकर यांना लिहिले आहे. जादूटोणाविरोधी विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे. दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी पुण्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर बुधवारी भटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाभोलकर यांच्या कार्याचा, विचारांचा गौरव करण्यासाठी त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, असे भटकर यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2013 रोजी प्रकाशित
दाभोलकरांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या – विजय भटकर यांची मागणी
आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पूरस्कार देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
First published on: 21-08-2013 at 05:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give maharashtra bhushan award to narendra dabholkar demand by vijay bhatkar