Premium

पुणे : मार्केटयार्डमध्ये मध्यरात्री गोडाउनला आग

मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाउनमधे मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Godown fire in market yard at midnight
मार्केटयार्डमध्ये मध्यरात्री गोडाउनला आग

पुणे : मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाउनमधे मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. गोडाऊनमधे कागद रद्दी आणि भंगार माल होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने गोडाउनच्या मुख्य दरवाजाचे कटरने कुलूप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार  अडकला नाही ना, याची ही खात्री केली. आग मोठी असल्याने जवानांनी अतिरिक्त अग्निशमन वाहनांना पाचारण केले. शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग पसरु नये याची काळजी घेण्यात आली. पाण्याचा मारा सुरू करून तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी गोडाउनमधे असलेले रद्दीचे कागद पूर्णपणे जळाले. गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो जळाले. नुकसान आणि आगीचे कारण समजू शकले नाही. कोणी जखमी झाले नाही. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे आणि जवानांनी आग आटोक्यात  आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Godown fire in market yard midnight fire brigade fire in control pune print news rbk 25 ysh