पुणे : सॅलिसबरी पार्क भागातील एका सदनिकेतून चोरलेला सोन्याचा मुकूट आणि सोनसाखळीची मुंबईतील झवेरी बाजराात विक्री करणाऱ्या चोरट्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सोन्याचा मुकुट, सोनसाखळी खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला पोलिसांकडून नोटीस बजाविण्यात आली आहे.

याप्रकरणी नरेश अगरचंद जैन (वय ४८, रा. गिरगाव, मुंबई) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी जैन याला न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती (डागळे) यांनी जैन याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. जैन याच्याकडून चोरलेला मुकूट, सोनसाखळी विकत घेणारा झवेरी बाजरातील मायका रिफानयरी वर्क्स पेढीचा मालक सनी मेटकरी याला भारतीय नागरी संहिता सुरक्षा कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याला स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांच्या पराभवाच्या गणिताला गणितानेच उत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून…”

हेही वाचा – Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैन याने केलेला गुन्हा गंभीर आहे. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का? यादृष्टीने तपास सुरू असल्याचे ॲड. संचेती यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने जैन याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (९ डिसेंबर) वाढ करण्याचे आदेश दिले.