जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली आणि नावाजलेली कंपनी गुगल आता आपला विस्तार करत आहे. गुगल (Google) लवकरच आता पुण्यातही आपलं नवं ऑफिस सुरू करणार आहे. त्यामुळे आता अनेक आयटी प्रोफेशनल्सना गुगलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

Google ने सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन ऑफिस सुरू करणार असल्याची घोषणा केली. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत हे ऑफिस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचं शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता अधिक आहे.

सध्या देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती सुरु आहे. त्यापाठोपाठ आता पुण्यातील ऑफिस सुरु झाल्यानंतर इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कंपनीने IBM चे वरिष्ठ कार्यकारी सुब्रम नटराजन यांची भारतातील कामकाजासाठी ग्राहक अभियांत्रिकी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच Google ने गेल्या वर्षी देशातील दुसरा क्लाउड एरिया सुरु केला आहे. दिल्ली-NCR मध्ये आणि सरकारी क्वार्टरच्याजवळ सर्व आकारांच्या व्यवसायांना विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देण्यासाठी गुगलनं हे सुरु केलं आहे. विशेष म्हणजे आता या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत Google पुण्यातही आपलं क्लाउड संबंधी ऑफिस सुरु करणार आहे. त्यामुळे राज्यातील आणि देशभरातील अनेक तरुण तरुणींना, फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी नोकरीची दारं उघडणार आहेत.