पुण्याच्या निरुपमा भावे यांनी वयाच्या ५५व्या वर्षी सायकल चालवायला सुरुवात केली. पुणे ते जम्मू, गोवा ते कोचिन, मनाली-लेह-खार्दुंगला अशी संपूर्ण भटकंती त्यांनी सायकलवर स्वार होत केली आहे. नुकतंच पंढरपूर ते घुमान असं २३०० किमी अंतर त्यांनी २३ दिवसांत पूर्ण केलं आहे. पुणे सायकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हा प्रवास सुरू केला. विशेष म्हणजे आतापर्यंच्या या सायकल प्रवासात त्यांच्या वयाच्या महिला म्हणून त्या एकट्याच होत्या.

निरुपमा भावे या पुणे विद्यापीठात गणित विषयाच्या प्रध्यापिका होत्या. सायकल चालवणे हा त्यांचा आवडता छंद. वयाच्या ७५व्या वर्षीही त्या आपला छंद जोपासत आहेत. तसंच इतर महिलांनाही त्या सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचा हा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.

‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक  करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.