अभिषेक पर्वते हा जळगाव जिल्ह्यातील ता. जामनेर येथील युवक. २०१७ मध्ये त्यानं आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण झाल्यानंतर पीएसआय होण्याचं स्वप्न घेऊन तो पुण्यात आला. २०१८ मध्ये पूर्व परीक्षा पास पण मैदानी चाचणीचा सराव करताना खुबा सरकला. डॉक्टरांनी रिप्लेसमेंट करायला सांगितलं व यापुढे धावता येणार नाही असं म्हटलं. यातून सावरत नवीन सुरुवात म्हणून अभिषेकने व्यवसाय करायचं ठरवलं.

२०१९ मध्ये त्याने मेन्स पार्लर सुरू केलं. पण कोरोनामुळे हा व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसाय पुन्हा उभारी घेत असताना शेजारी सुरू असलेल्या ईमारतीच्या बांधकामामुळे त्याचं दुकान पडलं. सततच्या अपयशामुळे आणि आर्थिक नुकसानीमुळे नैराश्य आलं. मात्र तरीही अभिषेकने माघार घेतली नाही. प्रयत्न आणि मेहनत करत राहिला. आज ३ वेगवेगळे व्यवसाय अभिषेक यशस्वीरीत्या सांभाळत आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने नैराश्यात गेलेल्या अनेकांसाठी अभिषेकचा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.