पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मागील तीन तासात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.या जोरदार पावसामुळे चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये पाणी शिरले.तर ८ ठिकाणी पाणी शिरले असून ६ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.अशी माहिती अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात साडे चार ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे पाहण्यास मिळाले.यामुळेच वाहन चालकांचे खूप हाल झाले.अनेक रस्त्यावर दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते.यामुळे अनेकांना आपली वाहने रस्त्यावर सोडून सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबणे पसंत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच दरम्यान चंदननगर पोलिस स्टेशन, कोथरूड येथील वेदभवन, कोथरुड, वनाजजवळील कचरा डेपो, पाषाण येथील लमाण तांडा,सोमेश्वरवाडी, वानवडी भागातील शितल पेट्रोल पंप, बी टी कवडे रोड, कात्रज उद्यान या भागात पाणी शिरले आहे.या परिसरातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे.तर पाषाण येथील एनसीएल,साळुंखे विहार, ज्योती हॉटेल, चव्हाणनगर,रुबी हॉल या परिसरात झाडपडी च्या घटना घडल्या आहे. तर पाषाण पंचवटी येथे मोठे झाड पडलेले असून २ वाहने झाडाखाली अडकलेले आहेत. त्यातील एक वाहन सुरक्षित आहे.तर एक तीन चाकी टेम्पो झाडाखाली अडकला आहे. या जोरदार पावसामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच त्याच दरम्यान बंद पडलेली वाहने रस्त्याच्या बाजूला करण्याचे कामे सुरू आहे. अशी माहिती अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.