पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. तसंच पुण्यात रात्री जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अनुपम कश्यपी यांनी सांगितल्यानुसार, “पुणे शहर आणि जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजल्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि रात्री १० नंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे”.

“शुक्रवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान होते. त्याचदरम्यान दुपारी एकच्या सुमारास शहरातील मध्य भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर पुणे शहर आणि जिल्ह्यात आज सायंकाळपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची स्थिती झाली आहे. यामुळे आज सायंकाळ पासून शहरातील अनेक भागात हलक्या सरी पडतील. तर रात्री दहानंतर पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे,” अशी माहिती अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

त्याचबरोबर शहरात पुढील चार दिवस ढगाळ हवामान राहील. या कालावधीत हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वेधशाळेने पुढील चार तासांत रायगड, ठाणे, जळगाव आणि नाशिकमध्येदेखील विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा दिला आहे.