जेजुरी वार्ताहर

श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडोबा गडावर देवाचे नवरात्र बसले आहे, मात्र ग्रामस्थांना मुख्य देवाचे आत जाऊन दर्शन घेण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे.हा प्रकार चुकीचा असून किमान नवरात्र होईपर्यंत सकाळी व संध्याकाळी काही तास ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी केली आहे.

जेजुरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने दोन महिन्यापूर्वी बैठक घेऊन घटस्थापनेअगोदर मंदिर दर्शनाला खुले करू असे सांगितले होते, मात्र आता काम अपूर्ण असल्याचे सांगून उंबऱ्यातूनच दर्शन घ्यायला सांगत आहेत. हा प्रकार चुकीचा असून व्हीआयपी मंडळी, विश्वस्तांचे नातेवाईक आल्यास त्यांना आत जाऊन दर्शन दिले जाते, मग ग्रामस्थांनी व सर्वसामान्य भाविकांनी काय केले आहे, असा सवाल त्यांनी विचारला .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंत सोनावणे म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली असून ,व्यवसायांवर परिणाम झाले आहेत.मुख्य मंदिरातील काम लवकर संपवून देवदर्शन सुरू करावे. मुख्य गाभाऱ्यात जायला बंदी असतानाही कोण कोण आतमध्ये गेले होते, हे समजण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज मिळावे अशी मागणी सोनवणे यांनी यावेळी केली.