पुणे : परदेशी विद्यार्थ्यांना भारतातील उच्च शिक्षण संस्थांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ‘एज्युकेशन इंडिया’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना या संकेतस्थळावर नोंदणी करून माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) यांनी या संदर्भातील संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची क्षमता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना समजावी, उच्च शिक्षण संस्थांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एज्युकेशन इंडिया या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना त्यांची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या उच्च शिक्षण संस्थांना नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची माहिती पाहता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नोंदणी करण्याच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि त्यांचे अभ्यासक्रम जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संकेतस्थळामार्फत केले जाईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांनी तातडीने संकेतस्थळावर नोंदणी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.