कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळ आणि परिसरात यंदा प्रथमच हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. या अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांसाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका, बाह्यरुग्ण तपासणी विभाग (ओपीडी), दुचाकी रुग्णवाहिका कार्यक्रमस्थळी असणार आहेत. त्यासोबतच महिलांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण तपासणी विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वतंत्र शौचालये उभारण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> करोना संसर्गावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले ” देश आणि इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षीपासून महिलांसाठी चेंजिंग रुम, हिरकणी कक्ष तयार करण्यास सुरुवात केली आहे. हिरकणी कक्षामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यांची देखील व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली. आतापासूनच काही अनुयायी कोरेगाव भीमा येथे भेट देत आहेत. त्यांच्या सुविधेसाठी स्तंभ परिसरामध्ये काही शौचालये उभारण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर चालकाबरोबरच एका अतिरिक्त व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. नागरिकांना पाणी पिण्यासाठी कागदी ग्लास दिले जाणार आहेत. हे ग्लास टाकण्यासाठी त्याच ठिकाणी सोय करण्यात आली आहे. याशिवाय संभाव्य करोनाच्या धोक्यामुळे नागरिकांना मुखपट्टी देण्याचे विचाराधीन आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.