राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याने आज पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये सपना चौधरीचा नाचगाण्याचा कार्यक्रम झाला. त्यावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, “अशा गोष्टी टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.” असं ते म्हणाले. त्यानंतर राज्यातील एसटी कामगारांच्या प्रश्नावर उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी रोज नवीन मुद्दे नवाब मलिक पुढे आणत आहेत. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद पाहिली आहे. ते तपासात सिद्ध होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच म्हणून राहिलेला सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असल्याचे म्हणाले आहेत. त्यावर गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडून माहिती घेतली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसल्याचे सांगण्यात आले आहे.