पुणे: रक्तपुरवठा बंद पडल्याने हाडांच्या पेशी निकामी होऊन अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस हा विकार होतो. या विकाराने एक तरुणी ग्रस्त होती. अनेक वेळा उपचार घेऊनही तिच्या वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे मणक्याला भूल देऊन तिच्यावर नावीन्यपूर्ण पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

या तरुणीला खुब्यात तीव्र वेदना होत होत्या. तिला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. रेडिओलॉजिकल तपासण्यांमधून अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस विकाराचे निदान झाले. तिच्या मणक्यात भूल देऊन व एक्स-रेच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तरुणीच्या वेदना कमी होऊन तिला आराम मिळाला. ही प्रक्रिया करत असताना नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करण्यात आला. या नावीन्यपूर्ण तंत्रांतर्गत १० मिलिमीटर डिकम्प्रेशन ब्लेडचा वापर करण्यात आला. त्यामुळे निकामी झालेल्या पेशी अचूकतेने काढण्यात यश आले.

Narendra Modi
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत
ravi pandit
जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील उद्योजक! जाणून घ्या ‘केपीआयटी’चे रवी पंडित यांच्याविषयी…
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
rain, Mumbai, Thane,
Mumbai News : मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तास वादळी वाऱ्याचे; पावसाचीही शक्यता
Now Commerce Department along with Railway Security Force is taking action against unauthorized hawkers Pune
रेल्वेचा फेरीवाल्यांवर दंडुका! खाद्यपदार्थ अन् पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवरही नजर
swati maliwal allegetion
“माझी मासिक पाळी सुरू होती, तरीही पोटात लाथा मारल्या”, स्वाती मालिवाल यांचा एफआयआरमध्ये धक्कादायक दावा
bhushan kadu reveals why he left maharashtrachi hasya jatra
“हास्यजत्रेतून मनाविरुद्ध एक्झिट घेतली”, भूषण कडूने सांगितला खडतर प्रसंग; म्हणाला, “गोस्वामी सरांना…”

हेही वाचा >>>महागलेल्या लिंबांच्या दरात अचानक घसरण का झाली?

या प्रक्रियेमुळे तरुणीच्या निरोगी हाडांच्या पेशींना धक्का न लावता बाधित झालेली जागा साफ करता आली. तिच्या मानेतून हाडाचा तुकडा या साफ केलेल्या बाधित जागेत बसविण्यात आला. त्यानंतर पेशींच्या पुनर्निर्मितीसाठी बोनमॅरो ॲस्पिरेट कॉन्सन्ट्रेट (बीएमएसी) हे इंजेक्शन देण्यात आले. या तरुणीला दोन दिवसांच्या देखभालीनंतर घरी सोडण्यात आले. पायावर जास्त भार न देता वॉकरचा वापर करण्याची सूचना तिला सुरुवातीला देण्यात आली. या प्रक्रियेत वापरले जाणारे स्वयंशोषक टाके हे दोन आठवड्यांत आपोआप पडले आणि हळूहळू तरुणीला आपले दैनंदिन कार्य सुरू करता आले.

रुग्णाच्या मानेतील हाडाचा तुकडा काढून निकामी झालेल्या पेशींच्या जागी बसवून पोकळी भरून काढणे आव्हानात्मक होते. यामुळे हाडांची योग्य पुनर्निर्मिती आणि संरचनात्मक अखंडता सुनिश्चित झाली.- डॉ. किरण खरात, रुबी हॉल क्लिनिक