पुणे : शहरात बेकायदा जाहिरात फलकांचे (होर्डिंग) पेव फुटले असताना महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात फक्त ८५ अनधिकृत जाहिरात फलक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक ८४, तर औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक अनधिकृत जाहिरात फलक आहे. तसेच दोन हजार ५९८ अधिकृत जाहिरात फलकांपैकी दोन हजार २४९ जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे. व्यावसायिक जाहिरात फलक परवानगी घेऊनच उभारण्यात आले असून, तात्पुरत्या स्वरूपातील फलकांची उभारणी करताना परवानगी घेतली जात नसल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

मुंबई येथील घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी तातडीने आढावा बैठक घेतली. त्यानंतर सर्व अधिकृत जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल करून घेण्याची, तसेच अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल दोन दिवसांत देण्याची सूचना डाॅ. भोसले यांनी परवाना आणि आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. या बैठकीत केवळ ८५ जाहिरात फलक अनधिकृत असल्याची माहिती आकडेवारीसह आयुक्तांना देण्यात आली.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

हेही वाचा >>>जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील उद्योजक! जाणून घ्या ‘केपीआयटी’चे रवी पंडित यांच्याविषयी…

शहरातील प्रत्येक चौकात, गल्लीबोळात, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना जाहिरात फलकांची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील अधिकृत आणि अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार शहरात दोन हजार ५९८ अधिकृत जाहिरात फलक असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

जाहिरात फलक उभारताना आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, परवानगी न घेता जाहिरात फलक उभारले जात आहेत. तथापि हे सर्व जाहिरात फलक तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. व्यावसायिक जाहिरात फलक परवानगी घेऊन उभारण्यात आले असून, त्यांचा आकारही परवानगीनुसारच आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>तापमानातील चढ-उताराचा आरोग्याला धोका वाढला! आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे काय?

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत जाहिरात फलकांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार ही कारवाई कायम ठेवण्यात येईल. पावसाळ्यात किंवा सध्याच्या अवकाळी पावसात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे परवाना आणि आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

अनधिकृत फलकांवरील कारवाईची संख्या – १,५६४

स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल- २,२४९

अधिकृत जाहिरात फलक- २,५९८

अनधिकृत जाहिरात फलक- ८५

नगर रस्ता परिसरात सर्वाधिक अधिकृत जाहिरात फलक

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४९१ अधिकृत जाहिरात फलक आहेत. त्या खालोखाल औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक ३७६ अधिकृत जाहिरात फलक आहेत. विशेष म्हणजे या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अवघा एक जाहिरात फलक अनधिकृत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २६६ अधिकृत जाहिरात फलक असून, येथे ८४ अनधिकृत जाहिरात फलक आहेत.

कारवाईची मागणी

घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात आणि धोकादायक जाहिरात फलक तातडीने हटवावेत, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. त्याबाबतचे निवदेन धंगेकर यांनी आयुक्त डाॅ. भोसले यांना दिले आहे.

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आणि दोन दिवसांत अहवाल देण्याची सूचना परवाना आणि आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. शहरात केवळ ८५ जाहिरात फलक अनधिकृत आहेत. अधिकृत जाहिरात फलक धोकादायक नाहीत.- डाॅ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका