लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: घरातील कोयता शेजाऱ्याला देण्याच्या वादातून दाम्पत्याने परस्परांना मारहाण केल्याची घटना मार्केटयार्ड भागात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
संबंधित दाम्पत्य मार्केट यार्ड भागातील एका सोसायटीत राहायला आहे. सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाशाने झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कात्री आहे का? अशी विचारणा केली. कोयता देण्यावरुन दाम्पत्यात वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांना मारहाण केली, तसेच कोयत्याने हल्ला केला, असे दाम्पत्याने एकमेकांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मार्केटयार्ड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.