पिंपरी-चिंचवड: शिरूर लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते, असा दावा अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांचा दावा म्हणजे बालिशपणा आहे. त्यांनी अज्ञानातून अशी वक्तव्य करू नयेत असा सल्ला त्यांनी अमोल कोल्हे यांना दिला आहे. शिवाजी आढळराव पाटील हे मंचर येथे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा : मावळ : ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी गुपचूप आल्या आणि अर्ज भरून निघून गेल्या!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी भोसरी येथे पार पडलेल्या मेळाव्यात शिरूर लोकसभेसाठी छगन भुजबळ यांना उभं करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात होतं. मात्र, छगन भुजबळ यांनी नकार दिल्यानेच बेडूक उड्या घेऊन राष्ट्रवादीत आलेले शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा टोला लगावला होता. यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल कोल्हे यांना संजय राऊत यांच्यासारखी काहीही बिन बुडाची विधानं करण्याची सवय लागली आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची उमेदवारी कशी जाहीर करतील असा प्रश्न उपस्थित करत अमोल कोल्हे यांनी अज्ञानातून अशी बालिश विधाने करू नयेत, असा सल्ला दिला आहे. पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांच्यासोबत राहिल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संयम ठेवावा, असा मोलाचा सल्ला शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिला आहे.