scorecardresearch

Premium

Pimpri Chinchwad : फायर कँडल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल

चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

pimpri fire news in marathi, pimpri fire 6 dead news in marathi, pimpri chinchwad fire news in marathi
Pimpri Chinchwad : फायर कँडल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पिंपरी : चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी एका कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. केकवरील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. त्यानंतर कारखान्यात स्फोट झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा : अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २४ घरफोड्या केल्याचं निष्पन्न

Accidental death of a 9 year old boy after a rickshaw with more than capacity passengers overturned panvel
पनवेल: क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा कलंडल्याने ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू
kasganj accident
उत्तर प्रदेशमध्ये मोठा अपघात! ट्रॅक्टर तलावात पडल्याने २२ जणांचा मृत्यू
horrific accident near Bhigwan
भिगवणजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
palghar accident marathi news, palghar district 4 died and 7 injured, two different
पालघरमध्ये अपघातांची मालिका, दोन दिवसांत तीन अपघात; चार जणांचा मृत्यू तर सात जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास तळवडे या ठिकाणी भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. घटनास्थळी चिखली आणि देहूरोड पोलीस त्याचबरोबर अग्निशमन दलाचे वाहने पोहोचली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून फायर कँडल कंपनी जळून खाक झाली आहे. यात काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कारखान्याला उत्पादन करण्यासाठी पोलिस व प्रशासनाकडून कोणतीच परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मालक व चालक दोघांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग लागली त्यावेळी १५ ते २० कामगार कारखान्यात काम करत होते, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पिंपरी- चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri chinchwad 6 died in fire break out at cake candle company in talwade area kjp 91 css

First published on: 08-12-2023 at 16:14 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×