पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करून आरोपीने घटनेच्या व्हिडिओची इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. या घटनेनंतर हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना साडे अकराच्या सुमारास घडली आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

चाकणमध्ये तीन अल्पवयीन मुले मद्यपान करायला बसली होती. त्यापैकी, दोघेजण हे सराईत गुन्हेगार होते. त्यादरम्यान, तिघांमध्ये वाद झाला. आरोपीसोबत असलेल्या मुलाला हत्या झालेल्या मुलाने कानशिलात लगावली. त्यावेळी सतरा वर्षीय सराईत गुन्हेगाराने त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. सहकार्याने हत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. मीच त्याची हत्या केली असं म्हणत तो व्हिडिओ काढायला सांगतो. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तात्काळ दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हत्या झालेल्या अल्पवयीन मुलावर खून केल्याप्रकरणी तर हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.