पिंपरी- चिंचवड: घरफोड्या करणाऱ्या सराईत दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ४ लाख ८० हजारांचे दहा तोळे सोने आणि चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. दयामान्ना शिवपुरे आणि दुर्गाप्पा श्रीराम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात फिरायला गेल्यानंतर हिंजवडीतील एका कुटुंबाच्या घरात शिरून आरोपींनी घरफोडी केली होती. सुदैवाने घरातील हॉलमध्ये सीसीटीव्ही असल्याने घरमालकाला ही बाब समजली, त्यांना नोटिफिकेशन गेलं आणि त्यांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही आरोपी हे सीसीटीव्हीत कैद झाले होते. सीसीटीव्ही वरून हिंजवडी पोलिसांनी काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा : उदयनराजेंचे खासदार म्हणून पिंपरी- चिंचवडमध्ये झळकले फ्लेक्स! चर्चेला उधाण
पोलिसांच्या अधिकच्या तपासात दुर्गाप्पा याच्यावर पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण १२ तर दयामान्ना याच्यावर तीन घरफोडीच्या गुन्हे दाखल आहेत अशी माहिती उघड झाली आहे. दोन्ही आरोपीना हिंजवडी भागातून अटक करण्यात आली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिली आहे.