पिंपरी चिंचवड : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक महत्वाचे मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील असणार आहेत. या सोहळ्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील चौघडा वादक रमेश पाचंगे यांची निवड करण्यात आली आहे. रमेश पाचंगे हे गेल्या ४० वर्षांपासून चौघडा वादन करतात.

हेही वाचा : पिंपरी : उद्योगनगरीत शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन… जाणून घ्या संमेलनाची तयारी

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं स्वप्न अखेर कित्येक वर्षांनी पूर्ण होत आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक दिग्गज आणि महत्त्वाची मंडळी, नेते सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात चौघडा वादनासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील रमेश पाचंगे यांना निमंत्रित करण्यात आले. रमेश पाचंगे म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे. राम मंदिरात चौघड्याचे नाद घुमणार आहेत. अयोध्येच्या राम मंदिराचे खजिनदार गिरी महाराज यांनी माझी निवड केली आहे. त्यांनी माझा चौघडा ऐकला होता. तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला अयोध्येत घेऊन जाणार. त्यांनी माझा सत्कारही केला होता. खास चौघडा वाजवण्यासाठी आमंत्रित केल्याने मी आनंदी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.