पिंपरी-चिंचवड : पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी करत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकींचा पर्दाफाश करत ४० लाखांची रोख रक्कम जप्त करत एकाला अटक केली आहे. शनिवारी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना झाला यामध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवले. पिंपरी- चिंचवडमध्ये गुंडा विरोधी पथकाची बुकिंवर नजर असून यामध्ये लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

विश्वचषक असल्याने पिंपरी- चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जातो, हे लक्षात घेऊन गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी मोठी कारवाई केली आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू असताना त्याच्यावर बेटिंग घेणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४० लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

हेही वाचा : “शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा या ब्रीदवाक्यानुसारच आम्ही कार्यरत”, शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांची टिप्पणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी आरोपी दिनेश हरीश शर्मा (वय ३८ वर्ष) याला अटक करण्यात आली आहे. इंग्लंड जिंकल्या एक रुपये साठ पैसे तर साऊथ आफ्रिका जिंकल्यास एक रुपये ६१ पैशाचा भाव मॅच पूर्वी ठरलेला होता. जस जसा मॅच रंगतदार स्थितीत जात होता तसे भाव वर खाली होत होते. ‘हाय लगाई’ नावाने हाच सट्टा सुरू होता. अखेर काळेवाडीतील त्या फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. दिनेश हा गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्यापुढे गया-वया करत माझी या प्रकरणातून सुटका करा असं म्हणत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, मात्र त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घटनास्थळी तब्बल ४० लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. या प्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.