पिंपरी : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी दिलेले प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात पक्षात प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पवार यांचे स्वागत केले. पवार यांची संघटकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरात भाजप वाढविण्यात पवार यांचे योगदान मोठे आहे. शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, प्रदेश प्रवक्ते, महापालिकेतील सभागृह नेते अशी विविध पदे त्यांनी भूषविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून पवार ओळखले जातात. त्यांनी भाजपकडून २०१४ ला भोसरी विधानसभा लढवत ५२ हजार मते घेतली होती.

solapur lok sabha 2024 marathi news
सोलापूरमध्ये चुरस वाढली, उभय बाजूने आक्रमक प्रचार
maharashtra political crisis eknath shinde
चावडी : एकनाथांचा ‘उदय’ !
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

हेही वाचा : मराठा आरक्षण : पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी, २८ तारखेला कॅन्डल मार्च काढण्यात येणार

महेश लांडगे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची निवडणूक लढविण्याची संधी गेली. तीन वर्षेच सभागृह नेतेपद ठेवले. शेवटच्यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. दुस-या पक्षातून आलेल्यांना पदे मिळतात. आपल्याला डावलले जात असल्याची त्यांची भावना झाली. तसेच भोसरीतून निवडणूक लढण्याची संधी नसल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये मराठा बांधव आक्रमक; जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

विधानसभा लढविण्यासाठी जाणार नांदेडला

एकनाथ पवार मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. भोसरीतून निवडणूक लढविण्याची संधी नसल्याने त्यांनी दोन वर्षांपासून नांदेडमधील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात संघटना बांधण्याचे काम सुरु केले. तिथे शेतकरी कामगार पक्षाखालोखाल शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे पवार यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. “मराठा समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली. मराठा आरक्षणास पाठिंबा देत असलेल्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.” – एकनाथ पवार