पिंपरी: शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नॅरेटिव्ह सेट करत आहेत. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य खोडून काढत प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. पुण्यात पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली. निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला धारेवर धरलं होतं. यावरून हे राजकारण पेटलेलं होतं. अखेर यावर अजित पवारांनी स्वतः उत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी पिंपरी- चिंचवडच्या सभेमध्ये अजित पवारांवर टीका केली होती. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला बोलू दिलं नसल्याचं म्हणत निधी वाटपाबाबत भेदभाव केल्याचा देखील आरोप त्यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. करणार पण नाही. सुसंस्कृत म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. इथे सर्वांचा आदर केला जातो. त्यामुळे ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत.

हेही वाचा : “कसा निवडून येतो बघतोच तुला”, अमोल कोल्हेंकडून अजित पवारांची नक्कल; गुलाबी जॅकेटवरूनही लगावला टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला बोलू दिले जात नाही. सत्ताधारी बळजबरी करतात आणि आम्हाला निधी दिला जात नाही. या गोष्टींमध्ये काही तथ्य नसल्याचे देखील अजित पवारांनी म्हटले आहे. बैठकीत मी सगळ्यांचं ऐकून घेत होतो. कुणाला दुखवायचं नाही, नाराज करायचं नाही. जे प्रश्न असतील ते समजून घेत होतो.