पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत गेल्या बारा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मासुका कलाम फकीर उर्फ शेख (वय २५), पिया नाझ्मुल सरदार उर्फ शेख (वय २७), रुजी हारून शेख (वय ३८), रूपा आकाश मंडोल (वय ४०, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश) अशी कारवाई करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख, मंडोल गेल्या बारा वर्षांपासून बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यात राहत होत्या. दलालामार्फत त्या बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आल्या होत्या. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस शिपाई तुषार भिवरकर यांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कुंटणखान्यात छापा टाकला. तेथून नऊ महिलांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : प्रवाशांना खुशखबर! पुणे-मुंबई रेल्वे प्रवास यंदाच्या पावसाळ्यात विनाअडथळा

चौकशीत शेख, मंडोल मूळच्या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे चौकशीत आढळून आले. त्यानंतर चौघींविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.