पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोची मिसळ तयार केली आहे. पहाटे तीन वाजल्यापासून मिसळीच्या तयारीला सुरुवात झाली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळवाटप करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमामध्ये पाच हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरे कीस ७० किलो, तमालपत्र पाच किलो, फरसाण १२०० किलो, पाणी चार हजार लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे.

हेही वाचा – देशातील प्रमुख सात महानगरांत घरांची विक्री होण्याचा कालावधी घटला

हेही वाचा – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीची दिल्लीला भुरळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीदेखील पाच हजार किलो मिसळ तयार होणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीदेखील सकाळी सातपासून पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पाच हजार किलो मिसळ तयार करण्यात येणार आहे. तसेच तेथे अभिवादनाकरिता येणाऱ्यांना नागरिकांना ती वाटप करण्यात येणार आहे.