scorecardresearch

Premium

अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा

बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेने सहायक निरीक्षकाला धक्काबुक्की केली.

pune encroachment, assistant inspector slapped by a woman, AI slapped by woman while removing encroachment
अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा (संग्रहित छायाचित्र)

पुणे : हडपसर भागात कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षक, तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेने सहायक निरीक्षकाला धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल विकी हुबळेकर (वय ३०, रा. बंटर शाळेजवळ, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक पंकज पालाकुडतेवार (वय ३०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेशोत्सवात हडपसर गाडीतळ परिसरात बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली.

pune bibvewadi goon, amravati jail, pune goon sent to amravati jail, pune police commissioner, mpda act
बिबवेवाडीतील गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अमरावती कारागृहात रवानगी
father and son arrested for denying office space to marathi woman in mulund
मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकरणाऱ्या पिता – पुत्राला अटक
patient from Telangana went missing Nagpur returned home one and a half months
नागपुरात हरवलेला तेलंगणातील रुग्ण दीड महिन्यांनी घरी; निराधार म्हणून मेडिकलमध्ये उपचार आणि…
Nagpur women employee st
नागपुरात प्रथमच ‘एसटी’ची महिला कर्मचारी उपोषणावर, विभाग नियंत्रकांवर आरोप काय?

हेही वाचा : शून्य ‘पर्सेटाइल’ असेल, तर परीक्षाच का घ्यायची? ‘नीट पीजी’बाबत केंद्राच्या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी

फूल विक्री करणाऱ्या हुबळेकर हिला पथारी उचलण्यास सांगण्यात आले. तेव्हा तिने पथकातील कर्मचारी राहुल चोर आणि सुभाष राखपसरे यांना शिवीगाळ केली, तसेच सहायक निरीक्षक पालाकुडतेवार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune assistant inspector of anti encroachment squad slapped by a woman while removing encroachment in hadapsar area pune print news rbk 25 css

First published on: 22-09-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×