पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखविले.त्यावरून विरोधक आक्रमक होत रस्त्यावर देखील उतरले,त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.त्या सर्व घडामोडी दरम्यान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे फ्लेक्स पुण्यातील पाषाण येथील रस्त्यावर लावण्यात आले आहे.
त्या फ्लेक्सवरील मजकूर पाहूयात…….
अण्णा आता तरी उठा….कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता… तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा….. होय मतांची चोरी आहे. india against votechori देशात मतांची चोरी होत असताना,देशात भ्रष्टाचार फोफावला असताना,देशात हुकूमशाही माजलेली असताना,देशाची लोकशाही धोक्यात असताना.अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे.अशा आशयाचे बॅनर लावण्यात आला आहे.तर या अनोख्या फ्लेक्स बाजीची पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.