पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात करावी लागणार आहे. त्यामुळे लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करू, असे महापालिकेने जलसंपदा विभागाला लेखी कळविले आहे. ही पाणीकपात नव्या वर्षापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… पिंपरी: मोठी बातमी! महापालिका गृहनिर्माण संस्थांचे पाणी बंद करणार; ‘हे’ आहे कारण

हेही वाचा… राज्यात उद्यापासून वातावरण कोरडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी वारे माघारी फिरल्यानंतर धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेसाठी केवळ १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. तसा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, सध्या महापालिका नेहमीप्रमाणे प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणांमधून घेत आहे. कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार पाणीवापर होत नसल्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्राद्वारे कळविले होते. त्यावर महापालिकेने पाणी जपून वापरण्याची ग्वाही दिली. मात्र, जलसंपदा विभागाने तोंडी मोघम न सांगता ठोस उपाययोजना काय करणार?, याबाबत माहिती देण्यास सांगितले. त्यावर महापालिकेने जलसंपदा विभागाला १६ टीएमसीपैकी दोन टीएमसी पाण्याची बचत करू. ही बचत दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात करू, जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत, त्यामुळे त्यातून पाणी वितरणात होणारी गळती कमी होईल, असे लेखी कळविले आहे. त्यामुळे लवकरच शहरात दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.