scorecardresearch

Premium

पिंपरी: मोठी बातमी! महापालिका गृहनिर्माण संस्थांचे पाणी बंद करणार; ‘हे’ आहे कारण

महापालिकेने शहरातील ३३१ मोठ्या संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची खासगी संस्थेमार्फत पाहणी केली.

Provision close taps institutions do not recycle treated water pimpri pune
महापालिका गृहनिर्माण संस्थांचे पाणी बंद करणार (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी: शहरातील दहा हजार चौरस मीटर व त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडावरील गृहनिर्माण संस्थांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंधनकारक असतानाही प्रकल्प बंद ठेवलेल्या ४१ मोठ्या संस्थांचे ११ डिसेंबरपासून नळजोड ताेडण्याचा इशारा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने दहा हजार चौरस मीटर व त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडावरील गृहनिर्माण संस्थांना सांडपाणी प्रक्रिया करुन त्याचा फेरवापर करणे बंधनकारक केले आहे. नियमानुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फेरवापर न करणाऱ्या संस्थांचे नळजोड बंद करण्याची तरतूद आहे. महापालिकेने शहरातील ३३१ मोठ्या संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची खासगी संस्थेमार्फत पाहणी केली.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
Thane Home Festival
यंदा ठाण्याच्या गृहउत्सवात शंभरहून अधिक प्रकल्प, क्रेडाई-एमसीएचआय संस्थेचे मालमत्ता प्रदर्शन
Satish Marathe opinion is that there is a need to develop a system of cooperative home finance institutions
सहकारी गृह वित्त संस्थांची व्यवस्था विकसित करण्याची गरज; सतीश मराठे

हेही वाचा… राज्यात उद्यापासून वातावरण कोरडे

तसेच मैलाशुद्धीकरण केंद्राची नियमित तपासणीही करण्यात येत आहे. यामध्ये २८४ संस्थांमध्ये प्रकल्प सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले. तर, ४७ संस्थांमध्ये सांडपाणी प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले. या सर्व संस्थांना पर्यावरण विभागामार्फत दाेन वेळा नाेटीसा देण्यात आल्या. नाेटीसा मिळताच सहा संस्थांमध्ये प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. तर, नाेटीसाला केराची टाेपली दाखविणा-या ४१ संस्थांचे ११ डिसेंबरपासून नळजोड ताेडण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील मोठ्या गृहनिर्माण संस्था, इतर बांधकाम प्रकल्पामधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व मैलाशुद्धीकरण केंद्र नियमाप्रमाणे कायमस्वरुपी कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. अनेक संस्था सांडपाणी प्रकल्पाचा खर्च परवडत नसल्याने प्रकल्प बंद ठेवतात. मात्र, या प्रकल्पासाठी महावितरणकडून सवलतीमध्ये वीज मिळत आहे. तसेच महापालिकेच्या वतीने मालमत्ता करामध्येही सवलत देण्यात येत आहे.

सांडपाणी प्रकल्प बंद असलेल्या संस्थांनी तत्काळ प्रकल्प कार्यान्वित करावा. अन्यथा ११ डिसेंबरपासून नळजोड ताेडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. – संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Provision to close the taps of institutions that do not recycle treated water in pimpri pune print news ggy 03 dvr

First published on: 01-12-2023 at 09:36 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×