पुणे : पुण्याचा विकासाचा कार्यक्रम (अजेंडा) गेल्या अडीच वर्षांत निश्चित केलेला आहे. आता त्याला गती देणे महत्त्वाचे आहे. ती गती आम्ही देऊ, असे वक्तव्य मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी फडणवीस शनिवारी पुण्यात आले होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. ‘पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारे कार्यक्रम होत आहेत. गेल्यावर्षीही या कार्यक्रमाला मी आलो होतो. पुणेकरांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला होता. सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमाने माझ्या कामाची सुरुवात होणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात; म्हणाले, ‘मी पुन्हा येईन….’

दादरच्या हनुमान मंदिराविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, न्यायालयाने मागच्या काळात निर्णय देऊन मंदिराची वर्गवारी निश्चित केले आहेत. जुनी मंदिरं ही त्या वर्गवारीनुसार नियमित करता येतात. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून नियमातील तरतुदीनुसार निश्चित मार्ग काढू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याचे पालकमंत्री भाजपला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार याबाबत चर्चा आहे. या संदर्भात विचारणा केली असता फडणवीस यांनी ‘सर्व माहिती लवकरच मिळेल’ असे उत्तर दिले.