पुणे : लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य पाहण्यास मिळत असून पुणे शहरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर आबा बागूल यांना पुणे लोकसभेची उमेदवारी डावलल्याने, त्यांनी कार्यकर्त्यांसह शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथील कार्यालयाच्या पटांगणात मूक आंदोलन केले. तर मेणबत्त्या पेटवून निषेध देखील नोंदविला. “पुण्यात निष्ठेची हत्या, निष्ठावंताना न्याय नाही… त्यांच्या विचारांना स्थान नाही” अशा आशयाचे फलक आंदोलनकर्ते हाती घेऊन सहभागी झाले होते. या ठिय्या आंदोलनामधून रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला आबा बागूल यांनी विरोध दर्शविला आहे.

यावेळी आबा बागूल म्हणाले की, शहर आणि राज्यपातळीवर काँग्रेसच्या निष्ठावंतांना सातत्याने डावलले जात आहे. या होणार्‍या अन्यायाविरोधात पुणे शहरातून राज्याच्या विविध भागात निष्ठावंताची न्याय संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. त्यातून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्या सर्वांशी संवाद साधून त्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यासमोर येत्या काळात गार्‍हाणं निश्चित मांडणार आहे. या संघर्ष यात्रेमधून पक्ष वाढीसाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Varsha Gaikawad Congress
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Chandrapur Congress Candidate pratibha dhanorkar Faces Backlash for Accept Lakshmi and Vote Remark
निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
The candidature of Bajrang Sonwane from the NCP Sharad Pawar group has been announced in Beed Lok Sabha constituency
बीडचा तिढा सुटला, बजरंग सोनवणे यांना उमेदवारी; मराठा ध्रुवीकरणाच्या परिघात नवी लढत

हेही वाचा : ‘रेडीरेकनर’ दरातील वाढीवर शिक्कामोर्तब

तसेच ते पुढे म्हणाले की, आयाराम गयारामासाठी राजकारणात निष्ठावंतच भरडला जात आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या या निष्ठावंतांच्या व्यथेची दखल घेतली जात नाही. मी मागील ४० वर्षांपासुन पक्षाच काम करत आलो आहे. प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. नगरसेवक, शहराचे उपमहापौर पद देखील भूषविले आहे. त्या माध्यमातून प्रभाग आणि मतदारसंघात काम केले आहे. पण काही काळापूर्वी आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. पण निष्ठावंतना डावलले गेल्याची खंत मनामध्ये आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला बागुल यांनी विरोध दर्शविला आहे. आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी आबा बागूल यांची समजूत कशी काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.