पुणे : वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डाॅक्टरला न्यायालायने दणका दिला. खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी तोतया डाॅक्टरला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

मीलनकुमार अमर ठाकूर (वय ३४, रा. धानोरी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. ठाकूर वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करत होता. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा उमेश गलांडे यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करून ठाकूरला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. त्याच्या दवाखान्यात ओैषधांचा साठा सापडला होता.

हेही वाचा : अबब् ! २०० सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई… सरकारी कार्यालयात सांभाळून जा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत मारुडे यांनी याप्रकरणाचा तपास करुन ठाकूरविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील सायली ठोकळ यांनी बाजू मांडली. सहायक फौजदार पाटील, हवालदार कोळप आणि पाटील यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने ठाकूरला दोषी ठरवून त्याला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.