पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. खून प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. यापुढील काळात गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येणार असून, ‘ईट का जबाब पत्थर से’ असेच धोरण पोलिसांकडून स्वीकारण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. आंदेकर खून प्रकरणानंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात तीन खून झाले आहेत. गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहे, याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला.

‘पोलिसांकडून गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येणार आहे. ‘ईट का जबाब पत्थर से’, असे धोरण राबविण्यात येणार आहे. आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वैमनस्यातून झाला आहे. आंदेकर यांचा खून कट रचून करण्यात आला आहे. आरोपींनी खून करण्यापूर्वी नियोजन केले होते. खून प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे ’, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

female cop threaten while clearing stalls for devendra fadnavis visit at dagdusheth ganpati
“तुला आंदेकरच्या ऑफिसला नेऊन दाखवते मी कोण आहे ते”, महिला पोलिसांना विक्रेत्या महिलेने दिली धमकी
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Vanraj Andekar, surveillance, Pune,
पुणे : दोन आरोपींकडून पाळत ठेवून वनराज आंदेकर यांचा खून
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
youths attacked with weapons in pune over dispute during dancing
पुणे : विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून तरुणांवर शस्त्राने वार – पोलिसांकडून तीन गुन्हे दाखल
Vanraj Andekar murder mastermind,
माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूत्रधार अटकेत
Female police officer Angha Dhawale suspended for threatening friend wife Pune news
पुणे: मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित
Rickshaw drivers in Pune
पुण्यातील रिक्षाचालकांची हद्दचं झाली रावं! रिक्षा चालवताना घडलं असं काही जे पाहून पुणेकरांना आवरेना हसू, पाहा Viral Video

हेही वाचा : पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती

आंदेकर प्रकरणात अल्पवयीनांना सज्ञान ठरविणार

आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात तीन अल्पवयीनांन ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीनांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अल्पवयीनांविरुद्ध सज्ञान आरोपी समजून कारवाई करण्यात यावी. त्यांना सज्ञान ठरविण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत अल्पवयीनांची योग्य ती चाचणी करून याबाबतचा अहवाल न्यायलायात सादर करण्यात येणार आहे.

गज्या मारणेला इशारा

कोथरुड भागातील गुंड गजानन उर्फ गज्या मारणे, निलेश घायवळ यांच्या साथीदारांनी समाज माध्यमात दहशत माजविणारी चित्रफीत नुकतीच प्रसारित केली. शहरातील गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांना समज देण्यात आली होती. समज देऊनही गज्या मारणे, निलेश घायवळ आणि शहरातील गुंडांच्या वर्तणुकीत फरक पडणार नसेल तर , त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला.

हेही वाचा : ‘घाशीराम’मधील गणपती श्रीकांत गद्रे यांचे निधन

शहरातील ७५० गुंडांची यादी

शहरातील गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी योजना हाती घेतली आहे. मोक्का, तसेच एमपीडीए कारवाई, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुंडाची यादी तयार करण्यात आली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ७५० गुंडांची यादी तयार करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.