scorecardresearch

Premium

बावधनमधून बेपत्ता तरुणाचा मृतदेह खंबाटकी घाटात सापडला

बावधन येथून आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह खंबाटकी घाटातील बोगद्याजवळ सापडला.

dead body found at khambatki ghat, khambatki ghat pune, pune college student dead body found at khambatki ghat
बावधनमधून बेपत्ता तरुणाचा मृतदेह खंबाटकी घाटात सापडला (संग्रहित छायाचित्र)

पुणे : बावधन येथून आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह खंबाटकी घाटातील बोगद्याजवळ सापडला. तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा संशय खंडाळा पोलिसांनी व्यक्त केला आहे. ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय १८, रा. बावधन) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. खंबाटकी बोगद्याजवळील वळणावर तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती खंबाटकी पोलिसांना मिळाली. तेथून काही अंतरावर असलेल्या नाल्यात दुचाकी पडली होती.

खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि विशाल वायकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटवली. सोनवणे कुटुंबीयांचे मूळ गाव अमळनेरचे आहे. ध्रुवचे आई-वडील आणि आजी मूळ गावी गेले होते. ध्रुव बावधन येथील घरी एकटाच होता. त्याच्या आत्याने गेल्या रविवारी (१७ सप्टेंबर) संपर्क साधला. तेव्हा तो घरी नसल्याचे समजले. ध्रुव शनिवारी (१६ सप्टेंबर) रात्री पावणेएकच्या सुमारास सोसायटीतून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते.

youth murder in Dadar East
मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या
Two people died Gondia district
गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली…
bus accident in buldhana, buldhana, student died in accident ,
बुलढाणा: भरधाव टिप्परची ऑटोला धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू; सहा जखमी
crime
आश्रमशाळेत शिक्षकाडून सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

हेही वाचा : आठवड्यातून एक दिवस ‘दप्तराविना शाळा’; पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील उपक्रम

त्याचा संपर्क होत नसल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात ध्रुवचा वावर वाई, पारगाव- खंडाळा परिसरात असल्याचे समजले होते. ध्रुवचा मृतदेह शुक्रवारी दुपारी खंबाटकी बोगद्याजवळ सापडला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा : पुणे : रोहित पवारांचे पुणे-मुंबई महामार्गावर भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले…

ध्रुवच्या मृत्यूनंतर धक्का

ध्रुव शांत, हुशार होता. तो अभियांत्रिकी शाखेत पहिल्या वर्षात होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला नवीन दुचाकी घेऊन दिली होती. गेल्या आठवड्यात तो बेपत्ता झाला होता. त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय, आप्तेष्ट, तसेच मित्रांना धक्का बसला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune dead body of engineering student missing from bavdhan found at khambatki ghat pune print news rbk 25 css

First published on: 24-09-2023 at 12:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×