पुणे : पाबळ परिसरातील ११४ गावांना स्वयंपूर्णतेचे धडे देण्याचा उपक्रम श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने हाती घेतला आहे. या अंतर्गत गावांमध्ये शेतीतील नवनवीन प्रयोग, जल व्यवस्थापन, पशुपालनाच्या चांगल्या पद्धती यासाठी पाठबळ दिले जात आहे. याचबरोबर अनेक गावांमध्ये पायाभूत सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. टीव्हीएस कंपनीचा सामाजिक विभाग असलेल्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टकडून १२ वर्षांपासून पाबळ परिसरात ग्रामविकासाचे काम केले जात आहे. यात ११४ गावांमध्ये कामे केली जात आहेत. त्याचा फायदा २० हजार जणांना झाला आहे. या गावांमध्ये ट्रस्टकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विशेषत: शेतीतील नवीन पद्धती आणि जल व्यवस्थापन या प्रकल्पांवर भर दिला जात आहे.

शेतीत नवीन पीकपद्धती आणता यावी, यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ट्रस्टने राबविलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पाचा फायदा अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना होत आहे. याचबरोबर पाबळ परिसरातील अनेक तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे या तलावांची साठवण क्षमता वाढून शेतकऱ्यांना जास्त पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

हेही वाचा : भुजबळ-जरांगे वाद शिगेला; राज्य सरकारने कुणबी नोंदींबाबत सर्व जिल्ह्यांना दिल्या ‘या’ सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला सक्षमीकरणावर भर

ट्रस्टकडून महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या वित्तीय समावेशकतेसाठी कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी महिलाचे बचत गट स्थापन करण्यात आले आहे. आता या गावांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक महिलांचे ३००हून अधिक बचत गट स्थापन झाले आहेत. या बचत गटांना ५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे बँकांकडून मिळाली आहेत. यामुळे महिलाच्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या आहेत.