पिंपरी : शहरात करोनाचे रूग्ण आढळत असून सध्या १८ सक्रिय रूग्ण आहेत. या रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह सहव्याधी आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

हेही वाचा : येरवडा कारागृहातच खून, कैद्याला कात्रीने भोसकले

राज्यात करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १८ रूग्ण आढळले आहेत. करोना रूग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रूग्णालयातील खाटा, प्राण वायूसह सर्व तयारी आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. मात्र, सध्या करोना रूग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत आयुक्त सिंह म्हणाले, करोना संशयित रूग्णांचे नमुणे घेऊन चाचणी करण्यात येत आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. आवश्यकतेनुसार सर्दी, खोकल्याच्या रूग्णांची करोना चाचणी करण्यात येत आहे. वाढता करोना आणि करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आढावा घेण्यात आला.

हेही वाचा : साखर उत्पादनाचा वेग मंदावला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात सद्यस्थितीत १८ रूग्ण सक्रिय आहेत. यापैकी १४ रूग्ण घरीच उपचार घेत असून चार रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्व रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. मात्र, काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे यांनी केले.