पुणे: नवी पेठेतील एका अभ्यासिकेत शनिवारी सकाळी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. नवी पेठेत ध्रुवतारा अभ्यासिका आहे. शनिवारी सकाळी अभ्यासिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळवली. या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा : पुणे: मध्यरात्री नदीपात्रात पडलेल्या तरुणाला जीवदान; अग्निशमन दलाची कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत अभ्यासिकेतील लाकडी साहित्य जळाले. आग लागली तेव्हा आतमध्ये विद्यार्थी नव्हते. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.