पुणे : एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणीला केक पाठविला. तरुणीने केक न घेतल्याने तिला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी अंकित सिंग (वय ३१, रा. केशवनगर, मांजरी रस्ता) याच्याविरुद्ध मारहाण, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोंढव्यातील उंड्री परिसरात राहायला आहे. तरुण तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. त्याने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या क्रमांकावरून तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : राज्यभर मोठी पाऊसतूट; कोकण वगळता सर्वत्र टंचाईची स्थिती, शेतकरी हवालदिल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणाने तरुणीच्या वाढदिवसाला तिच्या घरी केक पाठवला. तरुणीने केक नाकारल्याने तरुण चिडला आणि तरुणी राहत असलेल्या सोसायटीतच गेला. सोसायटीतील सुरक्षारक्षकाने अंकित याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने सुरक्षारक्षकाशी वाद घातला. त्यानंतर तो तरुणीच्या घरी गेला. तरुणीला मारहाण करुन तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.