पुणे : दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चाेरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण दुचाकीवरून गुरुवारी (२७ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी परिसरातून निघाल्या होत्या. न्याती माॅलसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक कोळपे तपास करत आहेत.