पुण्याच्या हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. ही घटना हिंजवडी मध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटने प्रकरणी मिक्सर चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रांजली यादव आणि आश्लेषा गावंडे अशी मृत्यू झालेल्या तरुणींची नावं आहेत. प्रांजली ही बी.सी.ए तिसऱ्या वर्षात तर आश्लेषा ही एम.सी.ए पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. घटने प्रकरणी चालक अमोल वाघमारेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील साखरे पाटील चौकात दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव सिमेंट मिक्सर अचानक पलटी झाला. या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या दोघींचा त्याखाली येऊन मृत्यू झाला आहे. प्रांजली यादव आणि आश्लेषा गावंडे या दुचाकीवरून चौकातून जात होत्या. तेव्हा सिमेंटच्या मिक्सरवरील चालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर चौकात पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा यांची दुचाकीसह मिक्सरच्या खाली आल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुणे : हिंजवडीतील साखरे पाटील चौकात दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव सिमेंट मिक्सर अचानक पलटी झाला. या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या दोघींचा त्याखाली येऊन मृत्यू झाला आहे. pic.twitter.com/4b02PUUZ6p
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) January 24, 2025
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या घटने प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तात्काळ चालकाला अटक केली आहे. प्रांजली यादव ही पुण्यात बी.सी.एच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आश्लेषा गावंडे ही एम.सी.ए. च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. आश्लेषा ही पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिक्षण घेत होती.