पिंपरी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा दिघी ग्रामस्थांनी राज्य सरकार विरोधात निदर्शने केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषण करत होते. या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी लाठीमार करीत हवेत गोळीबार केला. या घटनेच्या निषेधार्थ दिघी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा : शाळेची बनावट तुकडी दाखवून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न; तत्कालीन उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत सकल मराठा दिघी ग्रामस्थांनी राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात संतोष वाळके, कृष्णाभाऊ वाळके, सागर रहाणे, निलेश जोगदंड, बापू परांडे आदी सहभागी झाले होते.