पुणे : आमच्याच कुटुंबीयांपैकी किंवा मला माहीत नाही कोणता चेहरा माझ्या विरोधात उभा राहणार आहे. लोकशाहीमध्ये कोणी तरी माझ्या विरोधात लढलेच पाहिजे, तर त्या निवडणुकीमध्ये मजा आहे. तीन वेळा भाजप उमेदवाराविरोधात लढून मी जिंकले असून, आता चौथ्यांदा माझ्या विरोधात लढणाऱ्या उमेदवाराचे स्वागतच करते. काॅपी करून उत्तीर्ण होण्यापेक्षा गुणवत्तेवर उत्तीर्ण होण्यामध्ये मजा आहे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मांडली.

माळेगाव (ता. बारामती) येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. बारामती लोकसभेला उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात ‘ही चर्चा कोण करते हे तुम्हाला माहीत आहे’, अशी सावध भूमिका सुळे यांनी घेतली. आमच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते, अशी टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा : “अजित पवारांना देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री करणार नाहीत”, रोहित पवारांनी सांगितलं कारण

खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी उल्लेखनीय कार्य करणारा अजितदादा हा कर्तृत्ववान चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत असल्याने आता भाजपला निवडणुका जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, या अमृता फडणवीस यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. यापेक्षा मी अधिक काही बोलू शकत नाही’, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : सातारा येथील दंगल घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयए मार्फत व्हावा, भारतीय मानवाधिकार परिषदेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजितदादांना योग्य वेळी पाच वर्षे मुख्यमंत्री करण्याची आम्हाला संधी मिळणार आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच स्पष्ट केली होती. ज्या वेळी दादा मुख्यमंत्री होतील, त्या वेळी मी देवेंद्रजींना एकच विनंती करेन, की दादाला पहिला हार घालण्याची संधी मला द्या. मोठा भाऊ या नात्याने मित्रपक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा मोठा त्याग करत आहे. त्याबद्दल भाजपचे मनापासून आभार मानते”, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.