पुणे : शहरात गेल्या आठवड्यात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या. मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांना इशारा दिला. पुण्यात मुळशी पॅटर्न नव्हे तर कायद्याचा पॅटर्न चालणार, असा इशारा त्यांनी गुंडांना दिला.

गोळीबार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची ‌झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. महिनाभरात पोलिसांनी बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी २८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४२ पिस्तुले आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी गुंडांना इशारा दिला. पुण्यात फक्त कायद्याचा पॅटर्न चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार, मोक्का कायद्यान्वये कारवाईत जामीन मिळवलेल्या सराइतांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुंड सामान्य नागरिकांना त्रास देत असतील तर त्यांनी त्वरितपोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यापुढील काळात देखील शहरातील बेकायदा धंद्यांवर कारवाई सुरु राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.