पुणे : येरवडा कारागृहातून पसार झालेला कैदी बुधवारी सकाळी पुन्हा कारागृहात परतला. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला वृद्ध आई-वडिलांची काळजी वाटल्याने तो पसार झाल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे. बुधवारी सकाळी आई-वडिलांनी त्याला पुन्हा येरवडा कारागृहात हजर केले. जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला कैदी आशिष भरत जाधव हा सोमवारी (२० नोव्हेंबर) येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार झाला. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी जाधव कारागृहातून पसार झाल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

हेही वाचा : वाकडमध्ये बालविवाह उघडकीस; पती, भटजीसह दहा जणांविरोधात गुन्हा

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Thane Police, Arrest Parents, for Allegedly Murdering, One and a Half Year Old Daughter, Investigation Underway, crime in thane, crime in mumbra, parents allegedly murder daughter
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा

वारजे माळवाडी परिसरात २००८ मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात जाधवला २०१५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. वर्तणुक चांगली असल्याने कारागृह प्रशासनाने १६ ऑगस्ट २०२२ रोजी जाधवची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. जाधवला कारागृहातील अन्नधान्य विभागात काम देण्यात आले होते. सोमवारी सकाळी तो येरवड्यातील खुल्या कारागृहातून तो पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत होता. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात कारागृह अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. येरवडा पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. चौकशीत जाधवच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली. वृद्ध आई-वडिलांच्या काळजीपोटी तो कारागृहातून पसार झाल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा : जेजुरी भागातल्या नाझरेत बिबट्याची दहशत, शहरी भागात दर्शन झाल्याने नागरिक चिंतेत

बुधवारी सकाळी जाधवच्या आई वडिलांनी त्याला कारागृहात हजर केले. याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. येरवडा पोलिसांनी जाधव याला ताब्यात घेतले. कारागृहातून पसार झाल्या प्रकरणी जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव खुल्या कारागृहातून पसार झाला. तो येरवडा मध्यवर्ती कारागृहातून पसार झाला नाही. खुले कारागृह ही किमान सुरक्षा असलेली शासकीय संस्था आहे. चांगली वर्तणुक असणाऱ्या कैद्यांना तेथे ठेवण्यात येते. येरवडा मध्यवर्ती कारागृह ही वेगळी शासकीय संस्था आहे, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.