पुणे : रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात तब्बल २८ हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांना अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पुणे विभागात नोव्हेंबरमध्ये तिकीट तपासणी मोहिमेत २८ हजार ३०१ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच अनियमित प्रवासासाठी ९ हजार ३८६ जणांना ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या २०५ प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार ३५१ कुणबी नोंदी; ‘असे’ मिळविता येणार प्रमाणपत्र

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

आतापर्यंतची उच्चांकी दंड वसुली

पुणे विभागाने मागील महिन्यात उच्चांकी दंड वसुलीची कारवाई केली. तिकीट तपासणीतून पुणे विभागाने एकूण ३ कोटी ९ लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. पुणे विभाग सुरू झाल्यापासून आतापर्यंतचे मासिक तिकीट तपासणीचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे. याआधी यंदा एप्रिलमध्ये २ कोटी ८० लाख रुपयांची उच्चांकी दंड वसुली झाली होती.

हेही वाचा : ‘इझी पे’ कंपनीवर कर्मचाऱ्यांनीच मारला करोडोंचा इझी डल्ला!

“रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि तो न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.” – डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे