पुणे : अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अशा मंदिराचं उद्घाटन उद्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे भाषण करतेवेळी म्हणाल्या की आता ते जय श्रीराम म्हणतात, पण सुषमा स्वराज या नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणत असायच्या. त्यामुळे ते आता जरी जय श्रीराम म्हणत असले तरी आम्ही महिला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’च म्हणू.

हेही वाचा : पुणे : गर्लफ्रेंडच्या आईचा गळा दाबून खून, पाषाण परिसरातील घटना

pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आम्ही मर्यादेत राहूनच राजकारण आणि समाजकारण करू. प्रभू श्रीराम यांच्यामध्ये जेवढे गुण आहेत. ते सर्व गुण आपल्यामध्ये येऊ शकत नाही. आपण अनेक चुका करतोच, पण त्यांचे गुण जेवढे आत्मसात करता येतील, त्यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन उपस्थित नागरिकांना सुप्रिया सुळे यांनी केले.