पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरातील विविध संस्थांकडून शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दीड हजार पोलीस बंदोबस्तास राहणार आहेत.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. शहराच्या मध्य भागासह उपनगरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

हेही वाचा : महायुतीचे सरकार आल्यास मंत्रालयाचे गुजरातला स्थलांतर;माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कात्रज डेअरी परिसरात वाहतूक बदल

कात्रज येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने कात्रज डेअरी प्रवेशद्वार क्रमांक तीन ते वसंत विहार सोसायटी ते अहिल्यादेवी उद्यान दरम्यान असलेला रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.