scorecardresearch

Premium

खडकवासला-फुरसुंगी कालव्याच्या जागेवर मेट्रो मार्गिका, उड्डाणपूल?

खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान कालव्याऐवजी बोगदा प्रस्तावित करण्यात आला असून, कालव्याच्या जागेवर पर्यायी रस्त्याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे.

phursungi to khadakwasla, canal between Khadakwasla to phursungi, metro route, road, bridge, inspection for metro route road bridge conducted
खडकवासला-फुरसुंगी कालव्याच्या जागेवर मेट्रो मार्गिका, उड्डाणपूल? (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान कालव्याऐवजी बोगदा प्रस्तावित करण्यात आला असून, कालव्याच्या जागेवर पर्यायी रस्त्याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. कालव्याच्या जागेचा वापर रस्ता, उड्डाणपूल किंवा मेट्रो मार्गिका यांपैकी कोणत्या कामासाठी उपयुक्त राहील, याचा अभ्यास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनस्तरावर दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक घेतली. महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी कालव्याच्या जागेचा वापर कशासाठी करता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल अभ्यास करून सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. अहवालानंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Many trains are cancelled
अनेक रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप; सणासुदीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्यांचे हाल
fake plastic water tanks siezed by police
चक्क नामांकित कंपनीच्या बनावट टाक्या बनवण्याचा गोरखधंदा, ‘असा’ झाला पर्दाफाश
nitin gadkari
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जाणार – नितीन गडकरी
complete Pune Metro work by 2025
पुणेरी मेट्रोचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान

हेही वाचा : चिंचवडमध्ये एसटी बस रस्ता दुभाजकाला धडकली; प्रवासी बचावले

धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, उन्हाळी आवर्तनामुळे आणि गळतीमुळे सुमारे २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाया जाते. म्हणजे सुमारे ६ कोटी १७ लाख ३० हजार ७२५ लीटर पाणी वाया जाते. म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे हे पाणी आहे. त्यामुळे खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेल्यास या पाण्यात बचत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

हेही वाचा : जेजुरीच्या खंडोबा गडाला प्राप्त होणार ऐतिहासिक वैभव, विकास आराखड्यातून दुरुस्तीचे काम वेगात

जलप्रदूषण रोखण्याबरोबरच आहे, त्या पाणीसाठ्यात बचत करणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीचा बोगद्याच्या (बंद कालवा) अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून (स्टेट लेव्हल टेक्निकल ॲडव्हायजरी कमिटी – एसएलटीए) राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पातून दोन ते अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.

कालव्याची वहन क्षमता वाढेल

७.८० मीटर रूंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बंदिस्त जलवाहिनीतून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune tunnel is proposed instead of canal on the land between khadakwasla to phursungi inspection for metro route road bridge conducted pune print news apk 13 css

First published on: 26-09-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×