पुणे : पती समलैंगिक असल्याची बाब लपवून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीसह, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचा जानेवारी २०२२ मध्ये एकाशी विवाह झाला होता. महिलेचे सासर कारवार येथे आहे. सासरी गेल्यानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या निदर्शनास आले. विवाहानंतर महिलेला घरखर्च करण्यास भाग पडले. किरकोळ कारणावरुन महिलेला मारहाण करण्यात आली.
हेही वाचा : पुणे लोकसभा : एमआयएमचा उमेदवार म्हणजे भाजपची ‘बी’ टीम, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंची टीका
तुझ्यामुळे माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद झाले आहे. तुझ्यापेक्षा चांगली सून आम्हाला मिळाली असती, असे टोमणे सासू आणि नणंदेने मारले. टोमणे आणि मारहाणीमुळे महिला माहेरी नुकतीच निघून आली. पती समलैंंगिक असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली, तसेच किरकोळ कारणावरुन मारहाण करण्यात आली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करत आहेत.