पुणे : देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून पुणे लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे. त्यामध्ये भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळाली आहे. या चार ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. या निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमदेवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करताना दिसत आहे. त्यातच काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी एमआयएम ने पुण्यात उमदेवार जाहीर केल्यानंतर एमआयएम या पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पराभव दिसत आहे. त्यामुळे आता काही उमेदवार उभे केले जात आहे. त्याच दरम्यान एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएम या पक्षाला जो समाज मतदान करतो. त्या समाजातील नागरिकांना मागील काही निवडणुकीतील अनुभव पाहिल्यावर समजले आहे की, एमआयएमला मतदान केल्यावर भाजपचा उमेदवार निवडून येतो. आपल्या मतांचे विभाजन होते. त्यामुळे आजवर एमआयएमला जो समाज मतदान करित आला आहे तो यापुढे मतदान करणार नाही. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करेल आणि यंदा मतांचं विभाजन होणार नसल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Hemant Godse On Chhagan Bhujbal :
Hemant Godse : महायुतीत धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसला’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना
Jammu-Kashmir Terrorist
Jammu-Kashmir Terrorist : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, श्रीनगरमध्ये अद्यापही चकमक सुरू

हेही वाचा : ‘आयसर’च्या प्रवेश प्रक्रियेत बदल… आता कशी होणार प्रवेश परीक्षा?

तसेच ते पुढे म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना असल्यावर काही तरी शहरात काम दिसते. पण मागील दोन वर्षांत किमान पुणे शहरात एमआयएमचे काही तरी काम दिसले असते. मात्र आता निवडणुका आल्यावर ते उमेदवार आणतात. एमआयएमला पुणे शहरात उमेदवार मिळत नाही. त्यामुळे त्यांना बाहेरचा उमेदवार आणावा लागला आहे. त्यामुळे एमआयएमचा उमेदवार म्हणजे भाजपची बी टीम असल्याचे सांगत त्यांनी एमआयएम पक्षाच्या नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.